स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) :
- जिल्हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटूंबाकडे वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम होवून त्याचा नियमित वापर होणे अभिप्रेत आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) संकल्पनेत ग्रामपंचायतीला अभियानाचा केंद्रबिंदु समजुन संपुर्ण ग्रामपंचायत क्षेत्र निर्मल होणे अभिप्रेत आहे.
- स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) अंतर्गत स्वच्छतेचा विस्तार करुन त्यात वैयक्तीक स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या बाबीचा समावेश करण्यात आला आहे.
- वैयक्तीक शौचालय बांधकाम हे मागणी आधारीत असून शौचालय बांधकामाकरिता वैयक्तीक कुटुंबांना प्रवृत्त केल्या जाते. त्यानंतर प्रोत्साहन बक्षिसाकरिता पात्र कुटूंबाने शौचालय बांधकाम करून वापर केल्यानंतर प्रोत्साहन बक्षिस निधी रु. १२०००/- सदर कुटूंबास देण्यात येतो. एपीएल व बीपीएलच्या पात्र लाभार्थ्याला लाभ देता येतो.
- जलजीवन अभियान, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान.