पंचायत विभाग :

  • अमरावती जिल्ह्यात एकूण १९२४ महसुली गावे असून १५६६ आबाद गावे व ३५८ उजाड गावे आहेत. जिल्ह्यात एकुण ८४१ ग्रामपंचायती असून त्यापैकी ४३८ स्वतंत्र व ४०३ गटग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीद्वारे शासनाकडून व जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या अनुदानातून पिण्याच्या पाण्याच्या विहीरी, नळ योजना, दवाखाने, इमारती, ग्रामीण रस्ते, स्वच्छता, विजेच्या दिवाबत्तीची सोय, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये झाडे लावणे इत्यादी कामे राबविली जातात.ा
  • कलम ३९ (१)ची प्रकरणे, ग्रामपंचायत दत्पर तपासणी, ग्राम पंचायत कर्मचारी, ग्रामसेवक यांची आस्थापना विषयक कामकाज (नियुक्ती, बदली, पदोन्नती , खाते चौकशी प्रकरणे,निलंबन प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे).
  • १५ वा वित्त आयोग खर्च व सनियंत्रण, स्मार्ट ग्राम योजना, ग्राम पंचायत घरकर व पाणीकर वसुलीचे सनियंत्रण व ग्रामपंचायतीची अफरातफर प्रकरणे.
  • लेखा शिर्ष 2515 अंतर्गत जन सुविधा , नागरी सुविधा, मा.लोकप्रतिनीधी यांनी सुचविलेली कामे, मेळघाट भागातील पेसा कायदा बाबत कामकाज.