मृदा व जलसंधारण विभाग ( लघुसिंचन ) :
- स्थानिक क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने जि.प.ची निर्मिती झाल्यानंतर पाटबंधारे विभाग स्वतंत्र नव्हता. पाटबंधारे विभाग आवश्यक असल्यामुळे सन १९७२ पासुन पाटबंधारे विभाग, सिंचनाच्या कामाकरिता स्वतंत्र अशी योजना आखण्यात आली. ० ते १०० हेक्टर पर्यंत ओलीत क्षमता असलेल्या लघु सिंचन तलाव, पाझर, कोल्हापुरी बंधारे, उचल पाणी योजना या विभागामार्फत राबविण्यात येतात.
- लघुपाटबंधारे योजना( 0 ते 100 हेक्टर ) पाझर तलाव साठवण तलाव इत्यादी. महात्मा फुले जलभुमी अभियाना अंतर्गत वनराई बंधारे.
- धडक सिंचनविहिरी, जलयुक्त शिवार योजना.