कृषी विभाग :

  • अमरावती जिल्हयात एकुण १४ तालुक्यांचा समावेश असुन जिल्हयाचे भौगोलीक क्षेत्र १२,२१,७०० हेक्टर आहे
  • जिल्हयात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबिन, कापूस, तूर ही प्रमुख पिके घेतली जात असून एकुण क्षेत्राचे ८५ टक्के क्षेत्र या तीन पिकाखाली आहे.
  • अमरावती जिल्हा हमखास पावसाच्या प्रदेशात येत असून जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८६२.०० मि.मी. एवढे आहे.
  • जिल्हयात भारी,मध्यम तथा हलकी व भरड जमीन असुन भातकुली व दर्यापुर तालुक्यातील बहुतेक क्षेत्र अमरावती,चांदूर बाजार व अचलपुर तालुक्यातील काही भागात क्षारयुक्त जमीन आहे. मेळघाट मध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यातील हलकी तथा मध्यम भारी जमीन आहे.
  • कृषी विभागांतर्गत विविध योजना व कार्यक्रम राबविण्यात येतात राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसामुंडा कृषीक्रांती योजना, शेद्रिय खत कार्यक्रम जिल्हा निधीतुन शेतकऱ्यासाठी घ्यावयाच्या वैयक्तीक लाभाच्या योजना.