बंद

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

    1. ही वेबसाइट कोणासाठी आहे?
    ही वेबसाइट सर्व नागरिकांसाठी आहे, जिथे ते शासकीय सेवा, योजना बाबत माहिती मिळवू शकतात.

    2. जिल्हा परिषद म्हणजे काय?
    जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामीण विकासाशी संबंधित विविध शासकीय योजना व सेवा राबवते.

    3. जिल्हा परिषदेची मुख्य कार्ये कोणती?
    शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण, समाजकल्याण इ.सेवा पुरवणे.

    4. जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात?
    मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात.

    5. जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणते विभाग आहेत?
    सामान्य प्रशासन, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणी व स्वच्छता, समाजकल्याण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन इ.

    6. RTI अंतर्गत माहिती कशी मिळवता येईल?
    RTI अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज करून किंवा वेबसाइटवरील RTI Section मधील माहिती पाहता येते.

    7. तक्रार कशी नोंदवावी?
    ऑनलाइन तक्रार प्रणाली, लोकशाही दिन किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधून.

    8. महत्त्वाच्या सूचना व परिपत्रके कुठे मिळतात?
    वेबसाइटवरील Notice / Circular / Latest News विभागात.

    9. वेबसाइट सुरक्षित आहे का?
    होय. ही अधिकृत शासकीय वेबसाइट असून नागरिकांची माहिती सुरक्षित ठेवली जाते.

    10. नवीन योजना किंवा सूचना कशी मिळवता येईल?
    वेबसाइटवरील सूचना / ताज्या बातम्या या विभागातून नवीन योजना व सुचना मिळू शकतात.

    11. काही अडचणीसाठी मी प्रत्यक्ष भेट देऊ शकतो का?
    अत्यंत आवश्यक असेल तर संबंधित विभागात प्रत्यक्ष भेट देऊन किंवा वेबसाइटवरील संपर्क साधून माहिती मिळवता येईल.