विशेष माहिती
संजीता मोहपात्रा, (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद अमरावती, आपले स्वागत करीत आहे.
महाराष्ट्रातल्या विदर्भामधे असलेला अमरावती हा जिल्हा अतिशय विस्तीर्ण पसरलेला असुन याला ’अंबानगरी’ म्हणुन देखील ओळख आहे. पुराण काळापासुनचा इतिहास या जिल्हयाला आहे भगवान श्रीकृष्णाने रूक्मीणीला याच नगरीतुन पळवुन नेउन तिच्यासोबत विवाह केल्याचे सांगितले जाते. अमरावतीचे जुने नाव “उदंब्रावती” असे आहे पुढे अपभ्रंश होउन ’उम्ब्रवती’ आणि त्यानंतर “अमरावती”असे झाले. अमरावतीचे नाव इथे असलेल्या प्राचीन अंबादेवी मंदीरामुळे पडले आहे. अमरावतीच्या प्राचीन अस्तित्वाबद्दल जैनांचे भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या इतिहासातुन माहीती सापडते. त्यांच्या नक्काशीदार शिलालेखात असलेल्या उल्लेखानुसार या मुर्त्या 1097 मधे स्थापीत करण्यात आल्या. गोविंद महाप्रभुंनी 13 व्या शतकात अमरावतीला भेट दिली. असा प्राचीन इतिहास असलेला हा जिल्हा!…आणखी
पर्यटन स्थळे